मनोरंजन

Blog single photo

कावेरी नदीसाठी तीन अभिनेत्री आल्या एकत्र

05/09/2019

कावेरी नदीसाठी तीन अभिनेत्री आल्या एकत्र 

 मुंबई, 5 सप्टेंबर, (हिं.स) 

कावेरी नदीला जीवनदान देण्यासाठी तीन सुप्रसिद्ध अभिनेत्री एकत्र आल्या आहेत. इशा फाउंडेशन चे प्रमुख जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू यांची कावेरी नदीसाठी 'कावेरी कॉलिंग' हे देशव्यावी अभियान हाती घेतले आहे. या अभियानास आता अभिनेत्री काजल अग्रवाल, तमन्ना भाटिया आणि कंगना राणावत यांचा पाठिंबा मिळाला आहे. कावेरी नदीस वाचविण्यासाठी त्यांनी एक लक्ष झाडं कावेरी नदीच्या तीरावर लावण्याचा संकल्प केला आहे. याबाबत अभियाना बाबत एक संयुक्त व्हिडीओ नुकताच तमन्ना भाटिया यांनी ट्विटरवर प्रदर्शित केला. 'कावेरी कॉलिंग' हे अभियान रॅली फॉर रिव्हर अभियानाचाच भाग आहे. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top