मनोरंजन

Blog single photo

पाकिस्तानी गायिका रबी पिरजादाची इंडस्ट्रीतून एक्झिट

05/11/2019

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : अतिशय विचित्र वागण्यामुळे सातत्याने चर्चेत राहणारी पाकिस्तानची गायिका रबी पिरजादाने इंडस्ट्री सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट शेअर करून तिने ही घोषणा केली. रबीचा अश्लिल व्हिडीओ लिक झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिला टीकेला सामोरे जावे लागत होते. 

पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा ही आपल्या गायनापेक्षा विचित्र वागण्यामुळे कायम चर्चेत असते. विवस्त्र फोटो शुटिंग, साप-अजगरांसह व्हिडीओ काढणे आणि बेताल बोलणे ही रबीची खासियात आहे. अशा विचित्र वागण्यामुळे ती सोशल मिडीवर देखील सातत्याने ट्रोल होत असते.
भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर रबी पिरजादाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तिने अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करून, मोदींना ठार करण्याची धमकी दिली होती. तिच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते. काही दिवसांपूर्वी रबीचे विवस्त्र फोटो आणि व्हिडीओ लिक झाले होते. त्यामुळे तिच्यावर जबरदस्त टीका होत होती. यापार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमध्ये रबीने म्हंटले आहे की,
”मी, रबी पिरजादा इंडस्ट्री सोडत आहे. अल्लाह माझ्या पापांना माफी देवो आणि लोकांचा माझ्याप्रती असलेला दृष्टीकोन बदलो अशी मी आशा करते”, हे ट्विट करत रबीने तिच्या प्रोफाइल फोटो काळ्या बँकग्राऊंडने बदलला आणि इंडस्ट्री सोडत असल्याचे जाहीर केले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top