मनोरंजन

Blog single photo

रविवारी राधेश्यामची नवीन झलक

13/02/2021

हैदराबाद,  13 फेब्रुवारी  (हिं.स) :जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत अभिनेते  प्रभास  यांच्या  बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी राधेश्याम चित्रपटाची नवीन  झलक रविवार 14 फेब्रुवारीला म्हणजेच जागतिक प्रेम दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात
येणार आहे.  सकाळी 
9.18
वाजता .
राधेश्याम चे नवे स्वरूप प्रदर्शित केले जाणार
आहे
राधेश्यामच्या हिंदी गाण्यांसाठी  मिथुन आणि मदन भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात
आली आहे तर  तमिळ
, तेलुगु, कन्नड  आणि मल्याळम भाषेसाठी
संगीत दिग्दर्शक जस्टीन प्रभाकर यांची निवड करण्यात आली आहे.



मागिल वर्षी बाहुबली अभिनेते प्रभास यांच्या
जन्मदिनी
23 ऑक्टोबरला बिट्स ऑफ राधेश्याम नावाने एक संगीतमय भेट चाहत्यांना
देण्यात आली. प्रभास यांच्या बहुचर्चित
, बहुआयामी
आणि बहुभाषी राधेश्याम चित्रपटाची पहिली संगीतमय झलक-मोशन पोस्टर प्रदर्शित करून
प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या पात्रांचा परिचय करून देण्यात आला.  पहिली झलक
, संगीत
आणि प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या  जोडीस
सामाजिक माध्यमांवर   उत्तम प्रतिसाद
लाभला. आहे. बाहुबली अभिनेते प्रभास यांच्या जन्मदिनी अखिल भारत तसेच जगातील
काना-कोप-यातून सामजिक माध्यमांवर शुभेच्छांचा पाऊस पडला.



राधेश्याम या प्रेमकथेत विक्रमादित्याच्या
रुपात प्रभास दिसणार आहेत. चित्रपटात पूजा हेगडे 
प्रेरणाही भूमिका साकार करीत आहेत. जागतिक कोरोना संकटात  चित्रपटाचे चित्रीकरण युरोपच्या काही भागात,  इटली आणि हैदराबादमध्ये करण्यात आले.   10
जुलै रोजी दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार आणि प्रभास यांच्या
राधेश्याम चित्रपटाचे शीर्षक आणि पहिली झलक
प्रसिद्ध करण्यात आली.
ही एक प्रेमकथा असणार आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या
चित्रपटात प्रभास
पूजा हेगडे,
अभिनेत्री भाग्यश्री, सचिन खेडेकर  पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.  चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत असणार आहे.



माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ अभिनेते आणि प्रभासचे काका
कृष्णम् राजू यांच्या गोपीकृष्ण मुव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपटाची
निर्मिती होणार आहे. या चित्रपटात यु व्ही क्रीएक्शन आणि भूषण कुमार यांची टी-सिरीज
संस्था आणि  अनिल थडानी  यांची एए फिल्म्स  सुद्धा सहभागी आहे.  या चित्रपटात कृष्णम् राजू  आणि प्रभास अनेक वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत.
प्रभास आणि कृष्णम् राजू यांनी
' बिल्ला
' आणि ' रिबेल ' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.



हिंदुस्थान समाचार


 
Top