क्षेत्रीय

Blog single photo

नागपुरात दिवसभरात 5 हजार 338 नवे रुग्ण, 66 जणांचा मृत्यू

07/04/2021

नागपूर, 07 एप्रिल (हिं.स.) : नागपुरात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून आरोग्य यंत्रणा जवळपास कोलमडली आहे. नागपूर जिल्ह्यात बुधवारी 5 हजार 338 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 66 जणांचा मृत्यू झालाय. 

देशात महाराष्ट्र आणि राज्यात नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून दररोज रुग्णांचा आकडा वाढतो आहे. नागपूर जिल्ह्यात दिवसभरात 19 हजार 191 चाचण्या करण्यात आल्या. यात आज, बुधवारी 5 हजार 338 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्यावर पोहोचली आहे. गेल्या 2 दिवसात करोनाच्या मृत्यूमध्ये किंचित घट झाली आहे. मात्र, आज पुन्हा हा आकडा वाढताना दिसत आहे. दिवसभरात 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 34 तर ग्रामीण भागातील 25 आणि जिल्ह्याबाहेरील 7 जणांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वाढलेले मृत्यूचे प्रमाण बघता मृ्त्यूचा आकडा साडेपाच हजारांच्या वर गेला आहे.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे.. आज 3868 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं रुग्ण बरे होण्याचा दर 80.85 इतका आहे. तर, शहरात आजघडीला कोरोनाचे 42 हजार 933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 
हिंदुस्थान समाचार


 
Top