मनोरंजन

Blog single photo

' तान्हाजी: दि अनसंग वॉरियर ' प्रदर्शनासाठी सज्ज

09/01/2020

मुंबई, 09 जानेवारी
(हिं.स.)
 अनेक दिवसांपासून
प्रेक्षक ज्या क्षणाची
, ज्या दिवसाची आतूरतेने वाट पाहत आहेत तो क्षण
जवळ आला आहे. अभिनेते अजय देवगन यांचा   
बहुप्रतीक्षित
' तान्हाजी: दि अनसंग वॉरियर शुक्रवार 10 जानेवारी 
रोजी प्रदर्शनास सज्ज आहे.
 तसेच आधि लगिन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं  हे 
वाक्य म्हणणाऱ्या तान्हाजींची पराक्रम गाथा
, तान्हाजी मालुसरे आणि  उदयभान यांच्यातील संघर्श दाखविण्यात आला आहे.
सर्वांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.



अभिनेते अजय देवगन ' तान्हाजी मालुसरे ' त्यांची भूमिका साकारणार
आहे. तर उदयभानच्या रूपात अभिनेते सैफ अली खान दिसणार आहे.   चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर
बजावणार आहेत. याशिवाय अभिनेत्री काजोल
, अजिंक्य देव, जगपती बाबु आणि पंकज त्रिपाठी यांच्यासारखे
कलाकार चित्रपटात आहेत.



तान्हाजी मालुसरे
यांनी  ऐतिहासिक कोंढाणा किल्ला
जिंकण्यासाठी केलेले अदम्य साहस आणि पराक्रमाची गाथा ओम राऊत या चित्रपटाद्वारे
रुपेरी पडद्यावर संपूर्ण देशातील प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करीत  आहेत.  
10 जानेवारी रोजी तान्हाजी थ्री डी रूपामध्ये हिंदी
आणि मराठीत  देशभरात प्रदर्शित होणार आहे.
ओम राऊत यांनी 2015 साली लोकमान्य : एक
युगपुरुष नावाचा चित्रपट दिगदर्शित केला होता. तानाजी चित्रपटाची निर्मिती अजय
देवगन
, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे.



तान्हाजी मालुसरे यांची गाथा देशातील प्रत्येक
नागरिक तसेच भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला आला आहे
. ' तान्हाजी: दि अनसंग वॉरियर ' या चित्रपटासोबतच सुप्रसिद्ध ' अमर चित्र कथा ' या कॉमिक्स द्वारा  तान्हाजी मालुसरे यांची गोष्ट सादर
करण्यात येणार आहे. या कॉमिक्स चा फर्स्ट लुक
अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रदर्शित केलेला आहे. अभिनेते राणा दग्गुबाटी यांचे विशेष प्रयत्न आहेत.

हिंदुस्थान समाचार 



 
Top