मनोरंजन

Blog single photo

'पानिपत ' चे ट्रेलर 5 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

04/11/2019

मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स) आशुतोष गोवारीकरांच्या बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित 'पानिपत ' चे ट्रेलर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. सोमवारी याची माहिती ट्विटर च्या माध्यमातून देण्यात आली. यासोबतच संजय दत्त यांचे 'अहमद शाह अबदाली ' तसेच कृती सैनन यांचा पार्वती बाई फर्स्ट लुक पोस्टर सुद्धा प्रदर्शित करण्यात आले. 

आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत ' चित्रपटात संजय दत्त, कृती सैनन आणि अर्जुन कपूर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या लढाईवरील घटनाक्रमांवर आधारित आहे. 70 आणि 80 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान पुन्हा एकदा सिने-रसिकांच्या भेटीला येणार आहे. पानिपत चित्रपटात झीनत अमान सकीना बेगम यांची भूमिका साकारणार आहेत. पानिपत 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 चित्रपटाचे संगीत अजय-अतुल देणार आहेत तर कला दिग्दर्शक म्हणून भव्य देखावे उभारण्याचे काम नितीन चंद्रकांत देसाई करणात आहेत तर वेशभूषा विभाग नीता लुल्ला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती व्हीजन वर्ल्ड फिल्म्स, रोहित शेलटकर आणि आशुतोष गोवारीकर प्रोडूकशन्स या संस्थांनी केली आहे.  ऐतिहासिक चित्रपट आशुतोष गोवारीकरांसाठी नवीन नाहीत. याआधी त्यांनी ' जोधा अकबर ' आणि ' मोहेंजोदडो ' सारख्या चित्तत्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र स्वदेश आणि लगान या चित्रपटांनी गोवारीकरांनी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख प्राप्त करून दिली. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top