ट्रेंडिंग

Blog single photo

वादळग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी दिले वर्षभराचे वेतन

07/05/2019

नवी दिल्ली, 07 मे
(हि.स.)
ओडिशाचे
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी फनी वादळाग्रस्तांसाठी मदत म्हणून आपला एक वर्षाचा
पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी स्वरुपात देण्याची घोषणा केली आहे.
रम्यान , पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी
सोमवारी 'फनी' चक्रीवादळाने
प्रभावित झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच केंद्र सरकारकडून ओडिसातील
वादळाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी
1000 कोटी रुपये
जाहीर केले आहेत.ओडिशासह आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना 'फनी'चा फटका बसला आहे. 'फनी' चक्रीवादळ ओडिसा आणि पश्चिम
बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले आहे. ओडिसातील फनी चक्रीवादळाचा जोर ओसरला असला
तरी त्यात
34 जणांचा
बळी गेला.
 'फनी' चक्रीवादळ दरम्यान जवळपास 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी
हलवण्यात आलं. शिवाय
, हजारो
सरकार कर्मचारी आणि संघाचे स्वयंसेवक देखील यावेळी कामाला लागले होते. फनी
वादळाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देशातील इतर राज्य सरकारांनी आर्थिक मदत जाहीर
केली आहे. हिंदुस्थान
समाचार/ माधवी/मनीष 


 
Top