अपराध

Blog single photo

दिलीप माने यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

14/01/2020

सोलापूर 14 जानेवारी

(हिं.स) - माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीचा माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात दिलीप माने हे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

 माजी आमदार दिलीप माने हे देवदर्शनासाठी म्हसवडकडे निघाले होते. म्हसवडकडे जात असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ समोरून येणा-या दुचाकीस्वार व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार शहाजी राऊत (वय ५५) हे जागीच ठार झाले असून दिलीप माने हे जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर दुचाकी व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच माळशिरस पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक थोड्या वेळासाठी खोळंबली होती.
हिंदुस्थान समाचार 
Top