अपराध

Blog single photo

अमरावती : गुलिस्ता नगरात गोळीबार, एक जखमी

18/02/2021

अमरावती, 18 फेब्रुवारी (हिं.स.) : अमरावती शहरातील गुलिस्तानगर परिसरात बुधवारी 17 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पूर्ववैमनस्यातून एका फिरोज उर्फ नच्छू नामक युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करत तलवारीने हल्ला चढवला. यात फिरोज गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. 

 यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिरोज ऊर्फ नच्छू याचे बुधवारी दुपारी स्थानिक असोरिया पेट्रोलपंपजवळ काही युवकांशी भांडण झाले होते. त्यावेळी एकमेकांना पाहून घेण्याची भाषा बोलण्यात आली.त्यानंतर रात्री 11.30 वाजेच्या सुमारास फिरोज ऊर्फ नच्छू हा बेस्ट हॉस्पीटलच्या मागे उभा असताना एका कारमधून चार युवक आले. त्यापैकी एकाने फिरोज ऊर्फ नच्छू याच्या दिशेने तीन राऊंड फायर केले तर अन्य हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढविला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
हिंदुस्थान समाचार

 
Top