अपराध

Blog single photo

गोंदियात प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळले

17/09/2019

गोंदिया, 17 सप्टेंबर (हिं.स.)  : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यामधील कनेरी नाल्यात प्रेमी युगुलांचे मृतदेह आढळून आले आहे. संदीप यशवंत कावळे (वय 23) आणि संगीता बोहारे (वय 16) अशी मृतकांची नावे असून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. 

गेल्कया काही दिवसांपासून नेरी नाल्याजवळ दुर्गंध येत होता. हा दुर्गंध कसला आहे याचा गावक-यांनी शोध घेतला असता, त्यांना तरूण- तरुणीचे मृतदेह आढळून आले.   ग्रामस्थांनी यासंदर्भात तत्काळ दुग्गीपास पोलिसांना सूचना दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यावेळी मृतक तरुणाचे नाव संदीप यशवंत कावळे असून मुलीचे नाव संगीता बोहारे असे आहे. हे दोघेही कनेरी येथील रहिवासी असून त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. कुटुंबियांच्या विरोधामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जातोय.  संदीप आणि संगीताचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले. यावेळी दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. याप्रकरणी दुग्गीपार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 
हिंदुस्थान समाचार 


 
Top