मनोरंजन

Blog single photo

केनिया मध्ये सुटी साजरा करत आहेत आलिया आणि रणबीर ...

06/09/2019

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर (हि.स.) बॉलिवूडची सध्याची हॉट जोडी आलिया आणि रणबीर कपूर बर्‍याच वेळा  चर्चेत  राहिलेली आहे.  दोघांनीही नुकतेच मुकेश अंबानी यांच्या घरी जोडीने गणपतीचे दर्शन घेतले होते. आता आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ही जोडी सहलीसाठी केनियाला पोहचली आहे. 
नुकतेच रणबीर आणि आलिया केनियाच्या मसाई  नेशनल रिझर्व येथे पर्यटनाचा आनंद घेताना दिसून आले. 
त्यांचा केनियातील  फोटो  सोशल मीडियावर खूपच  व्हायरल झाला आहे. 
आलियाच्या हातात कॅमेरा आणि रणबीरच्या हातात दुर्बिणी असा हा फोटो आहे. या दोन्ही चा हा कुल  अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूप पसंत आला आहे. दुसरी कडे, आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. आणि खाली लिहिले आहे की, "सकाळ झाली आहे, एक नवीन दिवस आहे,  कदाचित ही ती जागा आहे, जेथून  प्रकाश येत  आहे." बॉलिवूड मध्ये रणबीर असा पण  चॉकलेटी बोय च्या  नावाने प्रसिद्ध आहे. अयान मुखर्जीच्या "भ्रमास्त्र" मध्ये ते  दोघे सह दिसणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी यांनी "सडक-2' चे शूटिंग आली कडेच पूर्ण केले. या चित्रपटात आलिया सह आदित्य रॉय कपूर, पूजा भट्ट, संजय दत्त यांच्या  मुख्य भूमिका आहेत.
हिंदुस्थान समाचार


 
Top