मनोरंजन

Blog single photo

नि:शब्दमचे टिझर 7 नोव्हेंबरला

30/10/2019

हैदराबाद , 30 ऑक्टोबर, (हिं.स) अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या आगामी ' नि: शब्दम ' चित्रपटाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. नि: शब्दमचे टिझर 7 नोव्हेंबरला म्हणजेच अनुष्का शेट्टी यांच्या जन्मदिनी प्रदर्शित केले जाणार आहे. यापूर्वी अनुष्का शेट्टी आणि अभिनेते आर माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन यांचे फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आले.  

नि:शब्दम मध्ये अनुष्का साक्षी या भूमिकेत दिसणार आहेत. माधवन या चित्रपटात 'ऍन्थोनी ' नावाच्या प्रथितयश संगीतकाराची भमिका साकारणार आहेत. नि: शब्दम तेलुगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी  आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नि:शब्दम् चित्रपटाद्वारे आर माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी ' रेंडू ' नंतर पुन्हा एकत्र येणार आहे. 

अनुष्का शेट्टी आणि आर माधवन शिवाय या चित्रपटात अभिनेत्री अंजली, शालिनी पांडे, माइकल मॅडसन आणि सुब्बाराजू सारखे मोठं-मोठे कलाकार आहेत. नि: शब्दमचे दिग्दर्शन हेमंत मधुकर करणार आहेत तर निर्मिती कोना वेंकट यांच्या कोना फिल्म फॅक्टरी या निर्मिती संस्थेद्वारे केली आहे.

एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी काही दिवस रुपेरी पडद्यापासून दूर होत्या. 2017 साली प्रदर्शित झालेल्या ' भागामती ' चित्रपट नंतर जवळपास एक वर्षाने अनुष्का शेट्टी यांच्या आगामी चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

हिंदुस्थान समाचार


 
Top