ट्रेंडिंग

Blog single photo

राज्यात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार - मुख्यमंत्री

23/03/2020

मुंबई, २३ मार्च (हिं.स.) : जमावबंदीनंतरही राज्यातील रस्त्यांवर गर्दी सुरू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव राज्य सरकारने कठोर निर्णय घेत संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे अनावश्यपणे कोणालाही आता रस्त्यावर फिरता येणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक बंद करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

ते म्हणाले की, आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही, तर जगात होते आहे तसे थैमान होईल. खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. 

देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील, असेही ठाकरे म्हणाले.


हिंदुस्थान समाचार


 
Top