ट्रेंडिंग

Blog single photo

महाराष्ट्रात दिवसभरात 8807 नवे कोरोना रूग्ण, 80 जणांचा मृत्यू

24/02/2021

मुंबई, 24 फेब्रुवारी (हिं.स.): महाराष्ट्रात बुधवारी 8 हजार 807 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात मंगळवारी 6 हजार 218 करोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे. बुधवारी राज्यात 80 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय.
राज्य सरकारने करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या अनेक भागात पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यात लॉकडाउन, संचारबंदी सारखे निर्णय घेतले आहेत. पण रुग्ण संख्या वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. 

हिंदुस्थान समाचार 
Top