मनोरंजन

Blog single photo

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयत आंतरराष्ट्रीय चित्रपट लघुपट महोत्सव

11/01/2020

पुणे 11 जानेवारी (हिं.स)


पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयतील मीडिया ऍन्ड कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आज आणि उद्या (दि. 12) आंतरराष्ट्रीय चित्रपट लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन व समापन महाविद्यालयाच्या अ‍म्फी थिएटरमध्ये झाले. हा सकाळी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान हा कार्यक्रम सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. 
 या महोत्सवात विविध देशातील 2000 हून अधिक लघुपटांची नोंद करण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील मीडिया ऍन्ड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. स्वप्नील कांबळे यांनी दिली. यंदाच्या महोत्सवात चित्रपट दिग्दर्शक क्रांती कानडे, धुर चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विदव्सं, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त बाल कलाकार यशराज कानडे आणि आगामी चित्रपटाचे अन्य कलाकार, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डा. परदेशी व इतर विभाग प्रमुख कर्मचारी सहभाग घेणार आहेत.
 हिंदुस्थान समाचार

 


 
Top