राष्ट्रीय

Blog single photo

नानकरा साहेबचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडावा : सुखबीर सिंह बादल

06/01/2020

नवी दिल्ली, 6 जानेवारी (हिं.स.) पाकिस्तानात नानकरा साहेब येथे झालेल्या हल्यासंदर्भात अकाली दलाचे प्रमुख खासदार सुखबीर सिंह बादल यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्ठमंडळाने परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांची सोमवारी भेट घेतली आणि संबंधित घटनेवर निवेदन सादर केले.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बादल म्हणाले की, आमच्यासाठी पवित्र अशा नानकरा साहेब येथे हल्ला करण्यात आला ज्यात एका शीख तरुणाचा मृत्यू देखील झाला. 

यासंदर्भात बादल  म्हणले की,या घटनेननंतरही पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आवश्यक पाऊले उचलले नसून शीख समुदायाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्र तसेच विविध आंतर-राष्ट्रीय संस्थांमध्ये भारत सरकारने आवाज उठवावा असे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात नानकरा साहेब येथे हल्ला करण्यात आला होता. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top