खेल

Blog single photo

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

03/04/2021

मुंबई, ३ एप्रिल (हिं.स.) : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १४ वा हंगाम १० एप्रिलपासून नियोजित आहे. मात्र त्याआधीच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सामन्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे स्टेडियमवर १० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान आयपीएलच्या १० सामन्यांची मालिका होणार आहे. १० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. यासाठी अवघा आठवडा राहिला असून तदानुषंगिक तयारी अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. असे असताना वानखेडे स्टेडियमवरील सर्व १९ कर्मचाऱ्यांची मागच्या आठवड्यात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे २६ मार्च रोजी समोर आले. तर अन्य पाच जणांचा १ एप्रिल रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय काय निर्णय घेणार की अन्य पर्यायी व्यवस्था करणार, याबाबत लवकरच स्पष्टता येईल.


हिंदुस्थान समाचार


 
Top