मनोरंजन

Blog single photo

कोरोनाच्या आर्थिक संकटावर काजल अग्रवाल यांनी दिला महत्वाचा संदेश

05/05/2020

नवी दिल्ली, 5 मे (हिं.स.) : कोरोनाच्या संकटात संपूर्ण जग व्यापून टाकले आहे आणि
जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने
निर्माण झाली आहेत. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी काही महत्वपूर्ण आर्थिक टीप्स दिल्या आहेत. या संदर्भात अभिनेत्री आणि उद्योजक काजल अग्रवाल यांनी काही
महत्वाचे विचार आणि उपाय  सांगितले आहेत. कोरोनाच्या आर्थिक संकटावर काजल
म्हणाल्या की
,  ज्यावेळी जागतिक
स्तरावर कोरोनाचा प्रभाव कमी होईल आणि जनजीवन सामान्य होण्याची लक्षणे दिसतील
तेव्हा आपल्या देशसाठी काहीतरी चांगले कार्य करुया. भारतीय पर्यटन स्थळानां  भेट देवूया. भारतीय उपहार गृहात जाऊया.  भारतीय संस्थानी तयार केलेली  परिधाने वापरूया. स्थानिक भाजी आणि फळ
विक्रेत्याना मदत आणि सहकार्य करूया जे व्यवसाय या आर्थिक संकटात त्रास सहन करीत
आहेत त्यांचे जीवन पुन्हा सामान्य करण्यासाठी जे काही शक्य असेल ते आपल्या परीने
करूयात
 असे आवाहन काजल अग्रवाल यांनी केलेय.

हिंदुस्थान समाचार    


 
Top