मनोरंजन

Blog single photo

निशब्दमचे थरारक ट्रेलर प्रदर्शित

06/03/2020

हैदराबाद, 6 मार्च (हिं.स) अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या बहुचर्चीत निशब्दम चित्रपटाचे ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. ट्रेलरमध्ये चित्रपटातील बहुतेक पात्रांची ओळखक करून देण्यात आली असून निशब्दम एक थरारपट असल्याचे समजते. त्यामुळे चित्रपटाची खरी कथा काय असणार आहे याकडे रसिकांचे आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ट्रेलरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्री अंजली आणि अनुष्का शेट्टी यांची दृश्ये उत्कंठा वाढवणारी आहेत.

निशब्दमचे हिंदी ट्रेलर अभिनेते मनोज वाजपेयी तर तेलुगू आणि तामिळ भाग अभिनेते नानी आणि जयराम रवी यांनी प्रदर्शित करीत शुभेच्छा दिल्या. 

निशब्दम तेलुगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम भाषांमध्ये 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. निशब्दमचे दिग्दर्शन हेमंत मधुकर करणार आहेत तर निर्मिती कोना वेंकट यांच्या कोना फिल्म फॅक्टरी या निर्मिती संस्थेद्वारे केली आहे.

निशब्दममध्ये अनुष्का एका विशेष भूमिका बजावीत आहे. अनुष्का साक्षी या मूक-कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. माधवन 'ऍन्थोनी' नावाच्या प्रथितयश संगीतकाराची भूमिका साकारणार आहेत. या शिवाय चित्रपटात अभिनेत्री अंजली, शालिनी पांडे, माइकल मॅडसन आणि सुब्बाराजू सारखे मोठं-मोठे कलाकार आहेत. 

निशब्दम् चित्रपटाद्वारे आर माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी 'रेंडू' नंतर पुन्हा एकत्र येणार आहे. एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी काही दिवस रुपेरी पडद्यापासून दूर होत्या. 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'भागामती' चित्रपट नंतर जवळपास दोन वर्षांनी अभिनेत्री अनुष्का शेट्टी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 
Top