क्षेत्रीय

Blog single photo

मनपाच्या दिरंगाईचा शिवप्रेमींना मनस्ताप

14/02/2020

औरंगाबाद, 14 फेब्रुवारी (हिं.स.) औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी येथील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यात आला. वर्षभरात हे काम होणे अपेक्षित होते. मात्र शिवजयंती अवघ्या काही दिवसावर आलेली असताना, पुतळ्याचे काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे शिवजयंती साजरी कशी करायची असा प्रश्न शिवप्रेमींनी पडला आहे. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेते, विकास जैन, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पाहणी केली.

हिंदुस्थान समाचार 


 
Top