अपराध

Blog single photo

अकोला: ऑनलाइन मटक्यावर पोलिसांचा छापा

12/02/2020

अकोला, 12 फेब्रुवारी (हिं.स.)
: जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आज, बुधावीर 
दुपारी ऑनलाइन मटक्यावर टाकलेल्या छाप्यात 10 जणांना
अटक केली आहे.
 बाळापूर परिसरात फन टार्गेट या ऑनलाईन अॅप वर कम्पुटर वर काही जण जुगार खेळत
असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून
  विशेष पथकातील प्रमुख व
कर्मचारी यांनी या जुगारावर छापा टाकला असता
, यातील नमुद
आरोपी हे कॅम्पुटर वर फन टार्गेट या ऑनलाईन अॅप वर पैश्याचे हारजीतचा खेळ खेळतांना
आढळून
  आले.यावेळी परमेश्वर रमेश वाघमारे, मोहम्मद मुस्ताक मोहम्मद एजाज, जावेद अहेमद शहा
अहेमद, अब्दुल जाकीर अब्दुल मजिद, शंकर मधुकर घोंगे , विश्वास गणपत खाडे ,स्वप्नील
देवेन्द्र शिरसाठ, गोपाळ लक्ष्मण वानखडे, अब्दुल नबी अब्दुल रहेमान, शेख हनीफ शेख
लाल यांच्यासह  जुगार अड्ड्याचा मालक फिरोज
सेठ यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींच्या विरोधात  बाळापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांचे
पासुन एकूण 69, 620 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.हिंदुस्थान समाचार 


 
Top