अंतरराष्ट्रीय

Blog single photo

जागतिक आरोग्य संघटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकास्त्र

26/03/2020

वॉशिंग्टन, 26 मार्च (हिं.स.) : करोनाच्या संसर्गावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू घेतली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला असून त्यांच्या भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला आहे. 


यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील अनेक देश जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेमुळे नाराज आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने चीनचे कौतुक करणे, त्यांना पाठिशी घालणे चुकीचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. करोनाच्या संसर्गासाठी कोणत्याही एका देशाला जबाबदार ठरवू शकत नसल्याचे म्हटले होते. त्याशिवाय करोना व्हायरसला चायनीज व्हायरस ही म्हणता येणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाला चायनीज व्हायरस संबोधले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. करोनाच्या मुद्यावर चीन व अमेरिकेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

हिंदुस्थान समाचार


 
Top