अंतरराष्ट्रीय

Blog single photo

स्टेट बँकेने उघडली मेलबर्नमध्ये शाखा

01/10/2019

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर (हिं.स.) जगभर सुरू असलेल्या मंदी सदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थकारणाला दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आपली शाखा सुरू केलीय. ऑस्ट्रेलियात शाखा उघडणारी एसबीआय पहिली भारतीय बँक ठरली आहे.
मेलबर्न येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात एसबीआयच्या शाखेचा उद्धघाटन सोहळा पार पडला. 


व्हिक्टोरियामध्ये याआधी सिप्ला, सायरेन्ट, एचसीएल, इन्फोसिस, रॅमको, टीसीएस, महिंद्रा आणि झोमॅटो या भारतीय कंपनी कार्यरत आहेत. व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध सुधारण्यास आमचं हे पाऊल भविष्यात मदत करेल, पुढील दहा वर्षांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले.

 एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार खारा म्हणाले की, मेलबर्नच्या गतिमान आणि व्यवसायास अनुकूल असलेल्या ठिकाणी शाखा उघडल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही देशांचे संबंध आणखी घट्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
एसबीआय बँकेच्या उद्धाटन कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियामधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना व्हिक्टोरीया संसदेचे कोषाध्यक्ष स्टिव डिमोपॉलोस म्हणाले की, व्हिक्टोरियामध्ये आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्वागत करतो. आमच्या राज्यात स्थापन होणारी पहिली भारतीय बँक आहे. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक बँकेने येथे केलेली ही गुंतवणूक आपल्या भरभराटीत भर टाकेल. एसबीआयमुळे आपल्या आर्थिक क्षेत्राला फायदा तर होईलच शिवाय रोजगारही उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
हिंदुस्थान समाचार


 
Top