मनोरंजन

Blog single photo

मॅडम तुसाद संग्रालयात काजल अग्रवाल यांचा पुतळा तयार

04/02/2020

सिंगापू, 4  फेब्रुवारी  (हिं. स.)अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या
चाह्त्त्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 
काजल अग्रवाल यांचा जगप्रसिद्ध मॅडम तुसादच्या
सिंगापूर संग्रालयात पुतळा उभारला
जाणार आहे. या पुतळ्याचे अनावरण काजल अग्रवाल यांच्या हस्ते बुधवार
5 फेब्रुवारी
रोजी होणार आहेमॅडम तुसाद संग्रालयात यापूर्वी अभिनेता प्रभास, महेश
बाबू  यांचेही मेणाचे पुतळे उभारण्यात आले
आहेत.  काजल अग्रवाल  यांनी अनेक हिंदी
, तामिळ,
तेलुगू चित्रपाटांमध्ये काम केले आहे. दिवंगत
अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतलळा देखील 
मॅडम तुसाद संग्रालयात उभारण्यात आला आहे
.काजल अग्रवाल सध्या इंडियन-2 या कमल हमन
यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. परंतू मॅडम तुसाद संग्रालयात
होणा-या कार्यक्रमासाठी त्या आल्या आहेत. मॅडम तुसादच्या कार्यक्रमासाठी मी खूप
खुश आहे असे एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी सांगितले
. 

लहानपणापासून
मॅडम तुसादमध्ये असलेल्या व्यक्तींबाबत मला आदर आणि आकर्षण होते परंतु आपणही या
मालिकेत सहभागी होऊ याचा कधीच विचार केला नाही. आता हे सत्य झाले आहे अशा शब्दात
त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.हिंदुस्थान समाचार


 
Top