ट्रेंडिंग

Blog single photo

बस्तर येथे नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत ‘सीआरपीएफ’चे दोन जवान शहीद

10/02/2020

रायपूर, 10 फेब्रुवारी (हिं.स.) : छत्तीसगडमधील बस्तर येथे नक्षलवाद्यांशी सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखील दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनचे 2 जवान शहीद झालेत. तर, या चकमकीत इतर 4 जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करणयात आले आहे. दरम्यान या चकमकीत एक नक्षलवादी देखील ठार झाला आहे. 


सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इरापल्ली गावात सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नक्षलवादी आणि कोब्रा बटालियनच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात सुरू केलेल्या अभियानादरम्यान ही चकमक सुरू झाली. या चकमकीनंतर सीआरपीएफ एक नक्षलवादी ठार झाला, तर चकमकीनंतर शस्त्रही हस्तगत करण्यात आले.
या चकमकीदरम्यान शहीद झालेले दोन जवान कमांडो बाटालियन फॉर रिसॉल्युशन अॅक्शन (कोब्राची 204 बटालियन) या सीआरपीएफच्या विशेष पथकाचे होते.
 हिंदुस्थान समाचार


 
Top