क्षेत्रीय

Blog single photo

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

08/10/2019

पुणे  8 ऑक्टोबर (हिं.स) विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दरवर्षीप्रमाणे आज (मंगळवारी) शहरात पथसंचलन केले. पिंपरी-चिंचवडच्या 19 नगरातील 10 ठिकाणी पथसंचलन झाले. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील 19 नगरातील 10 ठिकाणच्या विविध भागातून संचलन नेण्यात आले. हातात काठ्या घेतलेले गणवेशधारी स्वयंसेवक, शिस्तबद्ध संचलन पहायला मिळाले. पिंपळेगुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वागत केले.

पिंपरी-चिंचवड नगरातील देहूरोड येथील विकासनगर, निगडीतील रूपीनगर, चिखलीतील पूर्णानगर, खराळवाडी, पिंपरी, पिंपळेगुरव, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवडगाव या भागात पथसंचलन झाले. सभागृह नेते एकनाथ पवार पथसंचलनात सहभागी झाले होते.

हिंदुस्थान समाचार


 
Top