क्षेत्रीय

Blog single photo

शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस 

07/04/2021

शस्त्रक्रिया झाल्याने घरीच लस घेण्याचा निर्णय 

मुंबई, ७ एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. पवारांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी घरीच कोरोना लस घेण्याचा निर्णय घेतला. 

लस देतेवेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकासह दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे उपस्थित होते. त्या सर्वांचे पवार यांनी ट्वीट करत मनापासून आभार मानले. तसेच योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पवार कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते!

पवार यांनी १ मार्च रोजी जे.जे. रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होती. पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.


हिंदुस्थान समाचार


 
Top