मनोरंजन

Blog single photo

अभिनेत्री आलिया भटला कोरोनाची लागण

02/04/2021
मुंबई, २ एप्रिल, (हिं.स) : अभिनेत्री आलिया भट हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्राम द्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 


 ती म्हणाली की, माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सगळी काळजी मी घेत आहे. तुम्ही ही सुरक्षित रहा आणि काळजी घ्या असे तिने नमूद केले आहे. 

हिंदुस्थान समाचार 
Top