अपराध

Blog single photo

औरंगाबाद : तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

02/06/2020

औरंगाबाद, 02 जून (हिं.स.)  : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळावारी दुपारी पैठण तालुक्यातील खंडाळा येथे घडली. कृष्णा नारायण आरगडे असे या तरुणाचे नाव असून तो खंडाळा येथील रहिवासी आहे. 

यासंदर्भातील माहितीनुसार मृतक  कृष्णा आज, दुपारी नंदकुमार कचरू आरगडे यांच्या गट नंबर 53 मधील असलेल्या शेततळ्यामध्ये पोहोण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान ही बाब शेजारील शेतकरी राजेंद्र कल्याण आरगडे त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी या घटनेची माहिती गावातील नागरिकांना दिली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी कृष्णाला बाहेर काढून तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पाचोड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत्यु घोषित केले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलीय. 

हिंदुस्थान समाचार


 
Top