राष्ट्रीय

Blog single photo

माफी मागायचा प्रश्नच येत नाही : रजनीकांत

21/01/2020

 चेन्नई, , 21 जानेवारी (हिं.स.) : पेरियार प्रकरणार सुरु असलेल्या वादावर सुपरस्टार रजनीकांत यांनी महत्वाचे विधान केले आहे. मंगळावरी चेन्नई स्थित आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, तुघलकच्या कार्यक्रमात पेरियार यांच्या बाबतीत मी हे काही बोललो त्यात काहीच चूक नसून मी काही तयार केलेली घटना नाही. विविध वार्तापत्रात याचा उल्लेख झाला असून ते मी दाखवू शकतो. त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नाही. 

मागील आठवड्यात तुघलक या तामिळ मासिकाच्या 50व्या वर्धापनदिन कार्यक्रमात आपल्या भाषणात पेरियार यांचा उल्लेख करताना रजनी म्हणाले होते की, 1971 साली अंधश्रद्धा निर्मुलाच्या नावावर सालेम येथे पेरियार यांच्या सभेत श्रीराम आणि सीता यांचे कथित विवस्त्र चित्र लावण्यात आले होते. 

रजनीकांत यांच्या वक्तव्यमुळे तामिळनाडूत मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शन होत आहेत. काही द्रविड राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना पेरियार यांचा अपमान केल्याचा रजनीकांत यांच्यावर आरोप करीत आहे तर काही लोक माफीची मागणी करीत आहेत. द्रविदार विदुथुलाई कझगम या पक्षाने रजनी यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. थंथाई पेरियार द्रविधर कझगम या संस्थेच्या सदस्यांनी रजनीकांत यांच्या घराजवळ त्यांच्या विरुद्ध जोरदार नारे देत विरोध प्रदर्शन केले. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top