अपराध

Blog single photo

गर्भवतीवर बलात्कार, पिडीतेची आत्महत्या

14/02/2020

 हिंगोली, 14 फेब्रुवारी (हिं.स.)  हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथी धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. जाचास कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान तीन आरोपींवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
      
आत्महत्या करण्यापूर्वी पीडित महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने तिन्हीही गुन्हेगारांची नावे लिहिली आहेत. आरोपींनी महिलेची व्हिडिओ रेकॉर्डिंकरुन गावात दाखवल्याचा आरोप पीडितेने या सुसाइड नोटमध्ये केला आहे. या तिघांनाही कठोर शिक्षा व्हावी असे तिने म्हटले आहे. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार 


 
Top