मनोरंजन

Blog single photo

विक्रम चित्रपटासाठी कमल हसन सज्ज

07/04/2021
चेन्नई, 7
एप्रिल (हिं.स)जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित  तामिळनाडू विधानसभा  निवडणुकीसाठी प्रचार आणि मतदान कार्य पूर्ण
केल्यानंतर बहुभाषी अभिनेते
, बहुमुखी
कलाकार आणि मक्कळ नीदी मैयमचे प्रमुख  कमल
हसन आपल्या आगामी चित्रपट
'
विक्रम ' साठी सज्ज झाले आहेत. बुधवारी कमल हसन आणि दिग्दर्शक लोकेश कनगराज
खासगी विमानाने चित्रीकरणासाठी रवाना झाले. 
या संदर्भात ट्वीटरद्वारे  माहिती
देताना लोकेश कनगराज  म्हणाले
, " आरंभिकलामा... सुरुवात करायची ? "मागील वर्षी कमल हसन यांच्या जन्मदिनी विक्रम
चित्रपटाची झलक प्रदर्शित करण्यात आली. चित्रपटाची निर्मिती कमल हसन यांच्या राज
कमल  फिल्म्स इंटरनॅशनल द्वारे करण्यात
येणार आहे. संगीत अनिरुद्ध रविचंदर  देणार आहेत
. कमल हसन  यांचा हा 232 वा चित्रपट असणार
आहे. लोकेश कनगराज यांनी  अभिनेते विजय आणि
विजय सेतुपती यांचा बहुचर्चित  
बहुभाषिक  चित्रपट
मास्टर द्वारे पदार्पण केले.2018 साली विश्वरूपम 2 हा  कमल हसन यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
यासोबत ते तमिळ बिग बॉसमध्येही कार्यरत होते. राजकारण माझ्या व्यवसाय नसून  चित्रपट माझे काम आहे त्यामुळे राजकारणासोबत
चित्रपट शक्य आहे असे त्यांनी अनेक वेळा अनेक मंचावरून सांगितले.  तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 
कमल हसन यांनी  स्वतः दक्षिण कोइंबतूर  विधानसभा 
मतदार संघातून निवडणूक लढविली. हिंदुस्थान समाचार


 
Top