मनोरंजन

Blog single photo

कंगना राणावतच्या ' तेजस ' चे पोस्टर प्रदर्शित

17/02/2020

मुंबई, 17  फेब्रुवारी (हिं.स.) कंगना राणावत यांच्या
आगामी
' तेजस ' चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे
दिग्दर्शन सर्वेश मेवारा करणार असून रोनी स्क्रूवाला यांच्या आएएसव्हीपी निर्मिती
संस्थेच्या अंतर्गत केली जाणार आहे. चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याची भूमिका
बजावणार आहे.
' तेजस ' एप्रिल  2021रोजी प्रदर्शित
होणार आहे. पोस्टरमध्ये कंगना वायुसेनेच्या गणवेश असून पोस्टरला चांगला प्रतिसाद
मिळतो आहेकाही दिवसांपूर्वी   कंगना राणावत यांच्या ' थलैवी ' चित्रपटाचे नवे
पोस्टर  प्रदर्शित करण्यात आले.
'चित्रपटात कंगना
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता
यांच्याभूमिकेत दिसणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता उत्तम
नृत्यांगना देखील होत्या. यावेळी कंगना राणावत भरतनाट्यम करतानाचे पोस्टर
प्रदर्शित करण्यात आले आहे.थलैवी ' चित्रपट 26 जून  रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत
प्रदर्शित होणार आहे. विष्णू इंदुरी यांच्या विबेरी तसेच आणि शैलेश आर सिंह
यांच्या कर्मा मीडिया अँड एंटरप्राइजेस च्या संयुक्त विद्यमाने चित्रपटाची
निर्मिती केली जात आहे.
' थलैवी ' हा जयललिता यांच्या
जीवनपटाचे लेखन सुप्रसिद्ध लेखक आणि बाहुबली सिनेमाचे जनक व्ही विजयेंद्र प्रसाद
यांनी केले असून दिग्दर्शन ए एल विजय करणार आहे.हिंदुस्थान समाचार


 
Top