ट्रेंडिंग

Blog single photo

मला मुख्यमंत्री होण्यात रस नाही- शरद पवार

06/11/2019

मुंबई, 06 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, या सर्व शक्यता फेटाळून लावल्यात. तसेच तब्बल 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले असल्यामुळे आपल्याला आता मुख्यमंत्री होण्यात रस नसल्याचे पवार यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी पवार म्हणाले की, राज्यातील जनतेने शिवसेना आणि भाजपला सत्तेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच लवकरात लवकर सरकार स्थापन करावे आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे शरद पवार यांनी सांगितले. संजय राऊत यांनी 170 आमदारांचा आकडा कुठून आणला ते माहित नाही. त्यांनी माझीजी भेट घेतली ती सहज भेट होती. त्यांची आणि माझी भेट कायमच सकारात्मक होते तशी ती आजही झाली. वेगळे समीकरण असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातीस सत्ता स्थापनेच्या पेचावर पवार काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुणीही प्रस्ताव घेऊन आलेले नाही. तसे संख्याबळ असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केले असते. परंतु, जनतेचा कौल आमच्या बाजुने पडलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे शरद पवार यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top