अपराध

Blog single photo

भिवंडी वाडा महा मार्गावरील खड्ड्या मुळे अजुन एक मृत्यू.

29/10/2019


पालघर, २९ ऑक्टोबर ( हिं.स.): वाडा मनोर भिवंडी महामार्गावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू सत्राला सध्यातरी  पूर्णविराम लागणार असे दिसत नाही. ह्या महिन्यातील ह्या महामार्गावर चां दुसरा बळी सोमवारी रात्री खड्यामुळे झाला. भिवंडी हून एक बाईकस्वार रात्री वाडा रस्त्यावरील अंबाडी पुलावरून जात असताना खड्ड्यामध्ये त्याच्या मोटारसाकळ चे चाक गेल्यामुळे तो पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. ह्या बाबतीती गणेशपुरी पोलीस स्थानक अंतर्गत असणाऱ्या पालखाने चौकीत तक्रार नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपस करीत आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर खड्डयांमुळे झालेल्या ह्या मृत्यू मध्ये आजूबाजूच्या गावांत शोककळा पसरल्याचे दिसत होते. खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूचेगाम्भीर्य सरकार केव्हा घेणार आणि कारणीभूत अधिकाऱ्यांवर कार्यवाही केव्हा होणार ह्याकडे आता त्यांचे लक्ष्य लागले आहे. रात्रीच्या वेळी अंबाडी पुलावरील पाथ - दीप सुद्धा बंद असतात आणि कोणी त्यावर लक्ष्य सुद्धा देत नाहीत असा आरोप स्थानिकांनी केला.  
राजेंद्र दत्तू डोंगरे, ४२, हे रात्री ८.३० वाजेच्या सुमारास भिवंडीहून वाडयाला आपल्या मोटारसायकल वरून (एम एच 4-बीसी-2270घरी जात होते. अंबाडी पुलावरचा खड्डा रात्री च्या अंधारात त्यांना दिसला नसावा आणि त्यांच्या मोटारसायकलचे चाक त्या खड्ड्यात गेल्यामुळे ते पडले. पोलसांनी नोंद केलेल्या तक्रारी मधील माहिती प्रमाणे मोटारसायकलीचे चाक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते जागीच पडले. डोक्यामागील बाजूस मार लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला .  त्यांना तात्काळ भिवंडी येथील आय.जी.एम. रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. ते शेगदा (कोरडाचापाडा) गाव, ताल वाडा येथील रहिवाशी होते. 
यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी सुद्धा या महामार्गावर एक २३ वर्षीय डॉक्टरचा सुद्धा खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता. डॉक्टर नेहा शेख ह्या आपल्या ७ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या लग्नाच्या खरेदीकरिता आपल्या भाव सोबत भिवंडी होऊन येत होत्या. रस्त्यावरील खाड्यांमुळे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि त्या मागून येणाऱ्या ट्रक खाली चिरडल्या गेल्या. ह्या खड्डेमय महामार्गावर अश्या अमानुषपणे होणाऱ्या अपघाती मृत्यूकडे सध्या तरी सरकार चे लक्ष्य लागणार तरी कधी ह्याची वाट गावकरी पाहत आहे. "हा पूल आणि हा महामार्ग ह्याला तातडीची देखभालीची आवश्यकयता आहे", असे श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार म्हणाले. त्यांनी पुढे असे सांगितले कि हा संपूर्ण महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे आणि पुलावर पथ-दीप सुद्धा बंद आहेत असे त्यांनी सांगितले.  
हिंदुस्थान समाचार


 
Top