अंतरराष्ट्रीय

Blog single photo

अमेरिकेतील खासदार रॉन राइट यांचे कोरोनाने निधन; राष्ट्रपती बायडन यांनी व्यक्त केले दुःख

09/02/2021


वॉशिंग्टन, ९ फेब्रुवारी, (हिं.स) : अमेरिकेतील खासदार रॉन राइट यांचे कोरोनामुळे निधन झाले झाल्याचे वृत्त आहे. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राष्ट्रपती बायडन यांच्यासहित अनेक दिग्गजांनी दुःख व्यक्त केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात राइट आणि त्यांची पत्नी सुसान हे पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर त्यांना डलास येतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राइट हे बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोनाल्ड जॅक राइट पहिल्यांदा ते २०१८ मध्ये काँग्रेस मधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांना परराष्ट्र, शिक्षण आणि कामगार समितीत स्थान देण्यात आले होते. 

हिंदुस्थान समाचार


 
Top