खेल

Blog single photo

ठाणे : गोल्डन स्टारला हरवत निगेव्ह अंतिम फेरीत

11/02/2021

ठाणे, ११ फेब्रुवारी, (हिं.स.) : कर्णधार हेमाली बोरवणकरची आक्रमक फलंदाजी आणि दर्शना पवारच्या उपयुक्त गोलंदाजीमुळे निगेव्ह क्रिकेट अकादमीने गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीचा ३६ धावांनी पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. 
सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या हेमाली बोरवणकरने सहा चौकरांसह ४४ धावा करत संघाला दिडशतकी (८ बाद १५५ धावा) धावसंख्या गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सेजल राऊतने २७ आणि हुर्ले गालाने २१ धावांचे योगदान दिले. गोल्डन स्टारच्या जाग्रवी पवारने ३० धावा देत ३ विकेट्स मिळवल्या. सरस्वती जैस्वारने २, उल्का पाटील आणि मानसी पाटीलने प्रत्येकी एक विकेट मिळवली. निगेव्ह क्रिकेट अकादमीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीला दर्शना पवारने ३२ धावात ३ विकेट्स मिळवत २०षटकात ५ बाद ११९ धावांवर रोखले. रिया चौधरी आणि जान्हवी काटेने प्रत्येकी २७ धावा केल्या. गोलंदाजी प्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना जाग्रवी पवारने २४ धावा केल्या. सायली सातघारे आणि प्रकाशिका नाईकने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्या आरती वैद्य आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला निवड समिती सदस्या संगीता कामत यांच्या हस्ते हेमाली बोरवणकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हिंदुस्थान समाचार


 
Top