क्षेत्रीय

Blog single photo

आक्षेपार्ह बॅनर प्रकरणी शिवसेना पदाधिका-यावर गुन्हा दाखल

29/10/2019

पालघर, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : "भाजप मुक्त पालघर" ह्या मथळ्याखाली सोमवारी सकाळपासून विविध ठिकाणी आणि चौकात आक्षेपाह्य बॅनर झळकू लागल्यामुळे बोईसर मध्ये एक वेगळाच तणाव दिसून येत आहे. ह्या बॅनरवर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवार संतोष जनाठे सहीत पालघर मधील इतर पदाधिकारी यांचे फोटो होते. नुसते एवढेच नाही तर भाजप पक्षाचे चिन्ह "कमळ" आणि जनाठे यांनी अपक्ष उमेदवार लढताना त्यांचे निवडणूक चिन्ह "कप बशी " हे दोन्ही चिन्ह ह्या बॅनरवर जाणून-बुजून उलटे छापले होते. ह्या व्यतिरिक्त वातावरण अजून तणाव पूर्ण होण्याचे कारण म्हणजे या बॅनर मध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिन्दू युवा वाहिनी अशा संघटनांचे नाव सुद्धा नमूद केले होते. 
एखाद्या व्यक्तीने जर हा बॅनर पाहिला तर यातून एकच संदेश जातो की अपक्ष विधानसभा निवडणूक लढलेले संतोष जनाठे, डहाणू चे माजी आमदार आणि नुकतेच निवडणुकीत पराभूत झालेले  पास्कल धनारे , नालासोपारा चे भाजप कार्यकर्ते राजन नाईक, इतर पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि या हिंदू संघटना यांच्याच मुळे पालघर हा "भाजप मुक्त पालघर जिल्हा" झाला आहे आणि हे सर्वजण याचे शिल्पकार आहेत. आश्चर्य म्हणजे बॅनर या संपूर्ण बॅनरवर  9 लोकांचे फोटो लावण्यात आले असून त्यात तीन महिलांचाही समावेश आहे.
शहरातील विविध चौकात हे बॅनर दिसताच ही माहिती सर्वत्र पसरली आणि भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते ह्या सर्वांनी बोईसर पोलीस स्टेशनला धाव घेतली. सोमवारी रात्री बोईसर पोलीस स्टेशन मध्ये या मुद्द्यावरून तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. सध्या कोणालाही अटक केली केली नाही आणि पोलिस ह्याचा तपास करत आहे. शिवसेना समन्वयक, पालघर जिल्हा, प्रभाकर राऊळ, राजेंद्र राठोड आणि जिथे हे बॅनर बनवले आणि प्रिंट केले ते दुकान यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. राऊळ यांनी सांगितले की ह्या सर्व प्रकरणात माझे नाव गोवण्यात आली आहे. मी हे बॅनर छापले नाही परंतु ह्या सर्व प्रकरणाला माझा पाठिंबा आहे. भाजप मुळेच आम्ही वसई, नालासोपारा आणि भोईसर या तीन जागा हरलो. 
हिंदुस्थान समाचार 
 


 
Top