ट्रेंडिंग

Blog single photo

डॉ. प्रकाश आमटे कोरोना पॉझिटीव्ह, उपाचारासाठी नागपुरात आणले

25/02/2021

नागपूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) : ख्यातनाम समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलाय. त्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुवारी संध्याकाळी नागपुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. 

आमटे  यांना गेल्या 7 दिवसांपासून खोकला आणि ताप होता. त्यामुळे बुधवारी त्यांची कोरोना टेस्ट केली असता निगेटीव्ह आली. त्यानंतर औषधे घेऊनही ताप व खोकला कमी होत नव्हता. म्हणून चंद्रपूर पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्याचप्रमाणे छातीचे सीटी स्कॅन तसेच ब्लड चेकअपमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ. प्रकाश आमटे यांच्या संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रकाश आमटे यांनी केले आहे. कोरोनाने राज्यात परत हातपाय पसरल्याने हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पासह आनंदवन तसेच सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद ठेवण्यात येत असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top