खेल

Blog single photo

इरफान पठाण क्रिकेटमधून निवृत्त

04/01/2020

नवी दिल्ली, ०४ जानेवारी (हिं.स.) : क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा भारतीय गोलंदाज इरफान पठाण यांने शनिवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असून हा खूप भावूक क्षण आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात हा क्षण योतो. मला सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली हे भाग्य असल्याचे त्याने सांगितले. 


यावेळी इरफानने संघातील सर्व सदस्य, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि अर्थातच आपल्या चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला, 'मी त्या सर्व सहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो, ज्यांनी मला नेहमी सहकार्य केले. मी तो खेळ अधिकृतपणे सोडतोय, जो मला सर्वाधिक प्रिय आहे.' निवृत्तीची घोषणा करताना इरफान भावुक झाला होता. इरफानने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबर २०१२ रोजी खेळला होता. 


कसोटीत इरफानची कामगिरी
इरफानने २९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ३१.५७ च्या सरासरीने १,१०५ धावा केल्या. यात १ शतक तर ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावे ३२.२६ च्या सरासरीने १०० विकेट्स आहेत. ५९ धावा देऊन ७ विकेट्स हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. टेस्टमध्ये त्याने २ वेळा १० पेक्षा अधिक विकेट, ७ वेळा ५ विकेट आणि २ वेळा ४ विकेट्स काढल्या आहेत. 


एकदिवसीय आणि टी-२० '
 इरफानने वन डे करिअरमध्ये १२० सामने खेळून २३.३९ च्या सरासरीने १,५४४ धावा केल्या. त्याच्या नावे पाच अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने १७३ विकेट्स घेतल्या. टी-२० मध्ये त्याने २४ सामन्यांत १७३ धावा केल्या आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत. 
हिंदुस्थान समाचार


 
Top