ट्रेंडिंग

Blog single photo

केंद्र सरकारने 8 महिन्यात निर्णयांचे शतक गाठले- पंतप्रधान

12/02/2020

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : केंद्र सरकारने अवघ्या 8 महिन्यांच्या अल्पावधीत निर्णयांचे शतक गाठल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात दिली. 


यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सराकरने गेल्या 8 महिन्यात शेतकऱ्यांना भत्ता, दिल्लीतील 25 लाख नागरिकांना घरांवर अधिकार देणारा कायदा, ट्रान्सजेंडरांना अधिकार देणारा कायदा, नॅशनल मेडिकल कमिशन अॅक्ट, रस्ते अपघातांना आळा घालणारा कायदा, बोडो शांती समझोता, भव्य राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट बनवणे, असे निर्णय सरकारने घेतले, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 

कलम 370 हटवण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्र शासित प्रदेश आणि सीएए लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मोदी यांनी सांगितले. सरकारच्या चुका नक्कीच दाखवा. पण देशातील नागरिकांना जागरूकही करा. देशाला दिशा देणाऱ्या विषयांबाबत जागरूक करायला हवे, असं मोदी म्हणाले.

 ज्या प्रकारे माध्यमांनी स्वच्छ भारत, सिंगल युज प्लास्टिक हे अभियान चालवले तशाच प्रकारे जागरूकतेसाठी सतत अभियान सुरू ठेवले पाहिजेत. आपल्याला देशासाठी जगायचंय. देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आठवा आणि काम करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. हे दशक स्टार्टअपचे असणार आहे. भारत जागाचे नेतृत्व करणार आहे. हे दशक वॉटर इफिशियंट आणि वॉटर सफिशियंट भारताचे असेल. हे दशक 130 कोटी जनतेच्या स्वप्नांचे आणि विश्वासाचे असेल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार 
Top