अपराध

Blog single photo

अंत्यविधीसाठी जाताना वैनगंगा नदीत नाव उलटली, दोघांचा मृत्यू

14/01/2020

चंद्रपूर, 14 जानेवारी (हिं.स.) :  अंत्यविधीसाठी जात असताना नाव उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही दुर्घटना सावली तालुक्यात कढोली येथील वैनगंगा नदी घाटावर घडली. 
यासंदर्भातील  माहितीनुसार, चार्मोशी तालुक्यातील राजगोपालपूर येथील रामचंद्र हानुजी पेंदाम (वय 40) आणि परशुराम वागू आत्राम (वय 42) हे दोघे आपल्या सहका-यांसह मंगळवारी  सकाळी तलोधी घाटाहून नावेने सावली कढोली येथे अंत्यविधीसाठी चालले होते. यादरम्यान वैनगंगा नदीत नाव उलटून उपरोक्त दोघांचा मृत्यू झाला. तर इतर 6 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश मिळाले. नौका दुर्घटनेची माहिती मिळताच गडचिरोली आणि चंद्रपूरहून बचव पथक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेतील रामचंद्र आणि परशुराम दोघांचेही मृतदेह अद्याप गवसलेले नाहीत.   सावली चे पो. नी. खाडे यांच्या मार्गदर्शनात मृतदेहांचा शोध घेतला जातोय.
हिंदुस्थान समाचार 


 
Top