राष्ट्रीय

Blog single photo

परराष्ट्र मंत्री ए. जयशंकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले कॅव्हेट

12/02/2020

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलीय. जर गुजरातहून त्यांच्या राज्यसभा सदस्यत्त्वाला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्यास कुठल्याही निर्णयावर येण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी जयशंकर यांनी केलीय. 


गेल्या जुलै 2019 मध्ये निवडणूक आयोगाने गुजरात मधील राज्यसभेच्या दोन जागांवर वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या होत्या. या ठिकाणाहून एस. जयशंकर आणि जुगल ठाकेर यांची निवड झाली होती. यासंदर्भातील काँग्रेसच्या युक्तीवादानुसार जर या दोन्ही जागांवर एकत्रित निवडणूक झाली असली तर यापैकी एक जागा काँग्रेसला मिळू शकली असती. यापूर्वी गुजरात हायकोर्टाने जयशंकर आणि जुगल ठाकोर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका रद्दबातल केलीय. 

कॅव्हेट म्हणजे काय..? 
एखादे प्रकरण न्यायलयात येण्याची शक्यता असल्यास पक्षकार आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती कोर्टाकडे करतो. त्यानंतर न्यायालयाकडून या प्रकरणाची थेट सुनावणी टाळली जाते. शिवाय पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्ट कुठल्याही निर्णयावर स्थगिती देत नाही. 
हिंदुस्थान समाचार


 
Top