मनोरंजन

Blog single photo

तेलंगणाची मानसा वाराणसी 'मिस इंडिया 2020'

11/02/2021

मुंबई, ११ फेब्रुवारी, (हिं.स.) : तेलंगणाच्या मानसा वाराणसी हिने 'मिस इंडिया 2020' चा किताब पटकावला आहे. मणिका शेओकांड हीला मिस ग्रॅन्ड इंडिया 2020 चा मान देण्यात आला. तर, मान्या सिंह यंदाची मिस इंडिया 2020 रनर अप आहे. 
2019 ची मिस इंडिया सुमन रतन सिंह राव हीने मानसाला क्राऊन देत तिचे अभिनंदन केले आहे.
मानसा यंदा डिसेंबर 2021 मध्ये होणार्‍या 70 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे.

मुंबईत बुधवारी रात्री मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. मिस इंडिया 2020 चे 57 व आयोजन होते. या दिमाखदार फिनालेचे होस्टिंग अभिनेता अपारशक्ती खुरानाने केले. तर, बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहची या फिनालेला उपस्थित होती. कोरोनामुळे मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आले होते.
मिस इंडिया 2020 बनलेली मानसा वाराणसी ही 23 वर्षांची असून यापूर्वी तिने मिस तेलंगणा हा किताबही पटकावला आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top