नागपूर : कुख्यात गुंड अरुण गवळी करोनाग्रस्त, कारागृहत सुरू केले उपचार
10/02/2021
नागपूर, 10 फेब्रुवारी (हिं.स.) : मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी याला कोरोना झालाय. नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या गवळीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड अरूण गवळी आणि इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीय. त्यानंतर या सर्व कैद्यांना कारागृहातच स्वतंत्र सेलमध्ये विलगीकृत करण्यात आले आहे. त्यांच्यावर त्याठिकाणी औषधोपचार सुरू आहेत. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून गेल्या काही वर्षांपासून तो नागपूर कारागृहात बंद आहे.
हिंदुस्थान समाचार