खेल

Blog single photo

जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत संजीवनी अकाडमी चा संघ विजेता

30/09/2019


अहमदनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.):- नगर जिल्हा क्रीडा कार्यालयाद्वारे शेवगांव येथे घेण्यांत आलेल्या चौदा वर्षाखालील साॅफ्टबाॅल खेळाच्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमीच्या साॅफटबाॅल संघाने प्रथम क्रमांक मिळ वून संजीवनी अकॅडमी जिल्ह्याात प्रथम असल्याचे सिध्द केले.या विजयाने संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे,अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या वतींने देण्यात आली आहे.
                      
   संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली संजीवनी अकॅडमीत शैक्षणिक बाबींबरोबर विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी खेळालाही महत्व दिले जाते.जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी तेरा संघांनी भाग घेतला.संजीवनी अकॅडमीच्या संघाने उपांत्य फेरीत अकोले संघाला ९-० अषा गुणांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम फेरीत षेवगांवच्या संघावर १०-०१ अषा एकतर्फी विजयाची मोहोर उमटवून जिल्ह्या त संजी वनी अकॅडमीचा साॅफ्टबाॅल संघ प्रथम असल्याचे सिध्द केले.आता हा संघ सोलापूर येथे होणां-या विभागीय सामन्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यााचे नेतृत्व करणार आहे.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजींग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमांत सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
                          
हिंदुस्थान समाचार 


 
Top