राष्ट्रीय

Blog single photo

परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय : कुलगरु डॉ एम जगदीश कुमार

08/01/2020

नवी दिल्ली, 8 जानेवारी (हिं.स.) जेएनयु घडामोडींवर विद्यापीठाचे कुलगरु डॉ एम जगदीश कुमार यांनी महत्वाचे विधान केले आहे. जगदीश कुमार यांनी बुधवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयात मनुष्यबळ विकास विभागाचे सचिव अमित खरे यांची भेट घेतली आणि विद्यापीठातील परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था आणि संबंधित विषयांवर माहिती घेतली आणि चर्चा केली. 

याबाबत ट्विटर द्वारे माहिती देताना कुमार म्हणाले, " आज सकाळी मनुष्यबळ विकास मंत्रालयात विभागाचे सचिव अमित खरे आणि जी सी होसूर यांची भेट झाली. त्यांना विद्यापीठ परिसरातील परिस्थती आणि प्रशासन करीत असलेल्या कामांची माहिती दिली. जेएनयुत परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजिले जात आहेत. हिवाळी सत्राची नोंदणी करण्याचे काम सुद्धा सुरु असून त्यासाठी सर्व व्यवस्था उभारण्यात येत आहेत.हिवाळी सत्राची नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी वर्गासाठी तसेच अभ्यास करण्यासाठी अनुकूल वातावरण केले जात आहे." 

 जेएनयुत संवाद आणि माहिती तंत्रज्ञान यंत्रणा पूर्ववत करण्यात आली असून जवळपास 3552 विध्यार्थ्यांनी फी भरून हिवाळी सत्रासाठी नोंदणी केली आहे तसेच नोंदणीची तारीख 12 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. नोंदणी कार्यात विद्यापीठ सर्व प्रकारे विध्यार्थ्यांना मदत करेल असे आश्वासन जगदीश कुमार यांनी ट्विटर द्वारे दिले आहे. 


 हिंदुस्थान समाचार


 
Top