राष्ट्रीय

Blog single photo

अर्थसंकल्पासाठी सूचना आणि अभिनव कल्पना द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

08/01/2020

नवी दिल्ली, 08 जानेवारी (हिं.स.) :आगामी 2020-21च्या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना तसेच अभिनव कल्पना मागविण्यासाठी आवाहन केले आहे. ट्विटर द्वारे मोदी म्हणाले, "अर्थसंकल्प 130 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतीक आहे आणि भारताच्या विकासाचा मार्ग यातूनच सुकर होतो. मी सर्वाना आवाहन करतो की 2020-21 च्या अर्थसंकल्पासाठी माय गोव्ह वर आपल्या सूचना आणि अभिनव कल्पना द्या ." 

यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अर्थसंकल्पासाठी सूचना तसेच अभिनव कल्पना पाठवण्याचे आवाहन केले होते.
इच्छुक नागरिक माय गोव्ह www.mygov.in या संकेत स्थळावर जाऊन अर्थसंकल्पासंदर्भात आपले विचार मांडू शकतात. सूचनादेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2020 आहे. 2020-21चा अर्थसंकल्प 1 फेबृवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. सध्या सीतारामन अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक जगतातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहेत. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top