ट्रेंडिंग

Blog single photo

‘आप’ विरोधात भाजपने केला 500 कोटी रुपयांचा दावा

13/01/2020

दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या (आप) अडचणीत वाढ करणारी बातमी आहे. ‘आप’तर्फे शनिवारी ट्विट केलेल्या एका गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यावरून भाजपने, आम आदमी पार्टीवर 500 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. तसेच ‘आप’ विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. 

सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गायक मनोज तिवारी हे भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आहेत. दिल्ली भाजपचा चेहरा म्हणून देखील मनोज यांच्याकडे पाहिले जाते. आम आदमी पार्टीने शनिवारी मनोज तिवारी यांच्या भोजपुरी अल्बममधील मूळ गाण्यात बदल करून 'लगे रहो केजरीवाल' हे प्रचार गीत ट्वीटरवर शेअर केले. आपने विरोधी पक्षातील नेत्याचा व्हिडीओ स्वतःच्या प्रचारासाठी वापरला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोज तिवारी यांनी या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. 
तसेच आप विरोधात 500 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केलाय. दरम्यान, आम आदमी पक्षाला भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या चेहऱ्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे तिवारी हे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे 'आप' मान्य करत असल्याचा टोला भाजप नेते नीलकांत बक्षी यांनी लगावला आहे. 
हिंदुस्थान समाचार 
Top