मनोरंजन

Blog single photo

'83' चे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित

27/01/2020

चेन्नई, 27 जानेवारी (हिं.स.)  : चित्रपट '83' च्या चमूने
चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित केले आहे. चेन्नईत झालेल्या कार्यक्रमात
माजी कर्णधार आणि जेष्ठ क्रिकेटपटू कपिल देव
, कृष्णामचारी श्रीकांत आणि
अभिनेते  कमल हसन
, रणवीर सिंह
यांच्यासह
'83 ' चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत  फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. '83 'चित्रपट 1983 साली भारतीय
क्रिकेट संघाच्या विश्व
-विजयाच्या यशोगाथेवर
आधारित आहे.
 चित्रपटातील विविध कलाकारांच्या भूमिकेची झलक
दाखविण्यात येत आहे
 रणवीर सिंह या
चित्रपटात भारतचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.
" हरियाणा हुरिकेन "
या नावाने प्रसिद्ध असलेले कपिल देव यांनी 1983 च्या विश्व  चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत भारताला
सर्वप्रथम  विश्व चषक जिंकवून दिला होता.36 वर्षांनंतरही 1983
साली भारत आणि वेस्ट इंडिज संघात झालेल्या अंतिम सामन्याच्या आठवणी भारतीय क्रीडा
रसिकाच्या मनात ताज्या आहेत. रणवीर सिंह यांच्यासह
'83 ' चित्रपटात अनेक
कलाकार काम करीत असून चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे
दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.चित्रपट '83' च्या चमूने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचा
विषय बघता हिंदी सोबतच चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन मोठ्या निर्मिती संस्थांनी पुढाकार घेतला
आहे. 
'83' चित्रपटाच्या तेलुगू
भागाची प्रस्तुती अभिनेते नागार्जुन यांच्या अन्नपूर्णा स्टुडिओ मार्फत तर तमिळ
भाग अभिनेते कमल हसन यांच्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल या संस्थेद्वारे केली जाणार
आहे.चित्रपटाचे चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान आणि निर्माते
विष्णु इंदुरी यांनी नुकतीच अभिनेते नागार्जुन आणि कमल हसन यांची भेट घेत अधिकृत
घोषणा केली आहे. या उपक्रमासाठी  अभिनेते
नागार्जुन आणि कमल हसन यांनी आनंद व्यक्त करीत
'83' चित्रपटाच्या
चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतात क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टीसाठी जनता वेडी
आहे. आता क्रिकेटवर चित्रपट येत असल्यामुळे मिळणाऱ्या प्रतिसादकडे सगळ्यांचे लक्ष
लागले आहे..हिंदुस्थान समाचार


 
Top